spot_img

Vitamin B 12 : व्हिटॅमिन बी१२ का असते शरीरासाठी महत्वाचं ? ते नसल्याने शरीरावर काय परिणाम होतात ? जाणून घ्या…

spot_img

शरीरासाठी प्रथिने (Protein), खनिजांसह जीवनसत्वे (vitamins with minerals) देखील अतिआवश्यक असतात. असं म्हणतात जीवनसत्वांमुळे मानसिक आरोग्य चांगलं राहते. मात्र शरीरात एखाद्या जरी व्हिटॅमिनची कमतरता असली तरी आख्या शरीराचं संतुलन बिघडू शकते आणि आपल्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम दिसून येतो. यामुळे एखाद्या व्यक्तीला चिडचिड होते त्याबरॊबरच डोक्यात सतत वाईट विचार येत राहतात, कामात लक्ष लागत नाही. म्हणून आपण आपल्या आहारात व्हिटॅमिन असलेले पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.

व्हिटॅमिन बी१२ चे शरीरावर काय परिणाम होतात ?
व्हिटॅमिन बी१२ (Vitamin B12 ) हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. यामुळे आपल्या मेंदूतील ‘हॅपी हार्मोन’ सेरोटोनिन आणि डोपामाइन संतुलित राहण्यास मदत होते आणि शरीरात व्हिटामिनची कमतरता असल्यास मानसिक आणि शारीरिक दोन्ही गोष्टीवर परिणाम होतो. शरीरात व्हिटॅमिन बी१२ ची कमी असल्यास आपल्याला सतत थकवा जाणवतो त्याबरोबरच सुस्ती येते, श्वास घेण्यास त्रास देखील होतो, स्नायू हि कमकुवत होतात, मान आणि पाठदुखी वाढते, हातपायांना मुंग्या येतात, लक्ष केंद्रित करण्यास अडचण येते, इतकेच नव्हे तर स्मरणशक्ती देखील कमकुवत होते, जास्त प्रमाणात मूड स्विंगस होतात आणि डोक्यात नकारात्मक विचार येतात. हे सर्व काही परिणाम आपल्याला दिसू लागले कि व्हिटॅमिन ची शरीरात कमतरता आहे समजून जावे.

व्हिटॅमिन बी१२ कोणत्या आहारातून मिळते ?
व्हिटॅमिन बी१२ हे प्रामुख्याने मांसाहारात जास्त प्रमाणात आढळते. जर तुम्ही मांसाहारी असाल तर आहारात मासे, चिकन आणि अंडी यांचा अवश्य समावेश करावा. कारण हे पदार्थ व्हिटॅमिन बी१२ चे उत्तम स्रोत असतात. जर तुम्ही शाकाहारी असाल तर दूध, दही हे तुमच्यासाठी उत्तम आहे, तुमच्या आहारात समाविष्ट कारायाला हवे.

व्हिटॅमिन बी१२ चे महतव काय ?
व्हिटॅमिन बी१२ मुळे रक्तातील लाल पेशी तयारहोण्यास मदत होते, ज्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि मेंदूतील हॅपी हार्मोन या व्हिटॅमिनमुळे मानसिक शरीर संतुलित राहते. म्हणून व्हिटॅमिन बी१२ शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ