काळात नवीन पिढी तर कोणत्याही प्रकारचं जेवण खातात आणि ते हि कोणत्यापण वेळेत. किंवा बऱ्याच गृहिणींना सवय असते एकदाच जास्ती जेवण बनवून ठेवायचं आणि नंतर तेच गरम करून खायचं. .मग आपण उरलेलं जेवण फ्रिजमध्ये (refrigerator) ठेऊन टाकतो.जस कि भात भाजी आणि इतर पदार्थ आपण जास्त काळ टिकावे म्हणून फ्रीझमध्ये स्टोर (Store)करून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी ते गरम करू न खातो. पण तुम्हाला माहित आहे का, अनेकदा अन्न फ्रिजमधून काढल्यानंतर पदार्थ गरम करून खाणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. त्याबरोबरच पदार्थांमधील पौष्टिक मूल्य कमी होऊ शकते आणि काही पदार्थ विषारी देखील बनू शकतो. त्यातील बॅक्टरीयामुळे अन्नाचं रूपांतर विषात होऊ शकते.
खास करून भातासंदर्भात असं सांगितलं जातं की शिळा भात फ्रिजमध्ये ठेवला असेल तर तो पुन्हा गरम करू नये नाहीतर त्यातील पौष्टिक मूल्य निघून जातात. भात शिजवल्यावर 24 तासांनंतर त्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे तो भात विषारी देखील बनू शकतो. तसेच फ्रिजमध्ये ठेवलेला भात जेव्हा पुन्हा गरम केला तर त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात. परंतु त्याच्यातील विषबाधा होणारे घटक मात्र तसेच राहतात. त्यामुळे भात एकादिवसापेक्षा किंवा एका रात्रीपेक्षा जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवून नये आणि गरम करून खाऊ नये. जर तुम्ही असे करत असाल तर त्यामुळे शरीराला होणारे दुष्परिणाम लक्षात घ्या.
पुन्हा गरम केलेला भात खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते असे सांगितले जाते. बॅसिलस सेरियस नावाचे जीवाणू भात थंड झाल्यावर त्यात वाढतात. व पुन्हा गरम केल्याने जीवाणू नष्ट होतात, परंतु त्याचे जीवाणू भातातच राहिल्यामुळे भात एकप्रकारे विषारी बनतो. जेव्हा हा भात खाल्ला जातो तेव्हा हे विष अन्नातून पसरून विषबाधा निर्माण करू शकते.
शास्त्रज्ञानाच्या संशोधनानुसार, जर शिजवलेला भात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला नाही तर त्यात बॅक्टेरिया लगेच वाढू शकतात आणि भात पुन्हा गरम केल्यानंतरही हे बॅक्टेरिया त्यात टिकून राहू शकतात. जेव्हा बॅक्टेरिया वेगाने वाढतात तेव्हा ते पदार्थाला विषारी बनवतात आणि पोटाच्या समस्या निर्माण करू शकतात. हे सर्व टाळण्यासाठी, भात शिजवल्यानंतर कधीही खोलीच्या तपमानावर जास्त काळ ठेवू नये. भात शिजवल्यानंतर लगेच खाणे केव्हाही चांगले आणि फ्रिजमध्ये ठेवणार असाल तर तो एका दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवून खाऊ नये. भात पुन्हा गरम केल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात,ज्यामुळे पचनक्रिया बिघडू शकते. ज्यांना पचनाचा जास्त त्रास होतो त्याने शक्यतो शिळा भात खाणे टाळावे. त्यांनी कधीही शिळा भात पुन्हा गरम खाऊ नये.




