WIFI Speed : महागडा प्लॅन असूनही वाय-फायचा स्पीड कमी मिळतोय? ‘ही’ चूक तर ठरत नाहीये कारणीभूत!

spot_img

राऊटर ठेवायची योग्य जागा कोणती? घरातील सिग्नल वाढवण्यासाठी आणि इंटरनेटचा स्पीड सुधारण्यासाठी जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स.

घरी महागडा इंटरनेट प्लॅन घेऊनही जर वाय-फायचा स्पीड अपुरा पडत असेल, तर अनेकदा त्यासाठी इंटरनेट कंपनी नव्हे, तर राऊटरची चुकीची जागा कारणीभूत असते. वाय-फायचे सिग्नल सर्व दिशांना पसरत असल्याने राऊटर कधीही घराच्या एका कोपऱ्यात किंवा जमिनीवर ठेवू नये. तो नेहमी घराच्या मध्यभागी आणि एखाद्या उंच टेबल किंवा शेल्फवर ठेवावा, जेणेकरून प्रत्येक खोलीत उत्तम नेटवर्क मिळण्यास मदत होईल.

तसेच मायक्रोवेव्ह, फ्रिज, टीव्ही यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून आणि लोखंडी वस्तू किंवा जाड काँक्रीटच्या भिंतींपासून राऊटर दूर ठेवावा, कारण या गोष्टी सिग्नलमध्ये अडथळा ठरतात. राऊटरला दोन अँटेना असल्यास एक सरळ आणि एक आडवा ठेवल्याने सिग्नल अधिक चांगल्या प्रकारे पसरतात. याशिवाय, तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आठवड्यातून एकदा राऊटर रीस्टार्ट करणे फायदेशीर ठरते. योग्य काळजी घेतल्यास कमी खर्चात चांगला इंटरनेट अनुभव मिळू शकतो.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ