Shraddha Kapoors Eetha : श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’मध्ये शुभंकर एकबोटे साकारणार ‘ग्रे शेड’ भूमिका; म्हणाला, “प्रेक्षकांना माझा राग येऊ शकतो”

spot_img

अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आगामी ‘ईठा’ या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित या सिनेमातून त्यांच्या आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास रुपेरी पडद्यावर मांडला जाणार आहे. श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असून, सिद्धार्थ जाधवसह अनेक मराठी कलाकार या सिनेमाचा भाग आहेत. यामध्ये अभिनेता शुभंकर एकबोटे याचीही महत्त्वाची भूमिका आहे. आपल्या भूमिकेबाबत बोलताना शुभंकरने ही व्यक्तिरेखा ‘ग्रे शेड’ची असून, ती पाहताना प्रेक्षकांना कदाचित आपला राग येऊ शकतो, असे सांगितले. आपल्या आधीच्या भूमिकांपेक्षा हे पात्र पूर्णपणे वेगळे असल्याचेही त्याने स्पष्ट केले. त्याने या व्यक्तिरेखेला काहीशा विकृत आणि महिलांबद्दल चुकीची मानसिकता असलेल्या व्यक्तीचे स्वरूप असल्याचे सूचित केले, मात्र भूमिकेचा पूर्ण खुलासा करण्यास नकार दिला.

आपल्या व्यक्तिरेखेतील अनेक गोष्टी साकारताना मजा आल्याचे सांगत त्याने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि संपूर्ण टीमचे श्रेय दिले. या भूमिकेचे नेमके स्वरूप काय आहे, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. ‘ईठा’ हा सिनेमा 28 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता असून, प्रदर्शनाच्या तारखेत बदल होतो का, याकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ