Crime News : दुचाकी चोर पोलिसांच्या ताब्यात; चोरीच्या चार दुचाकी जप्त

spot_img

ओतूर,प्रतिनिधी:दि,९ एप्रिल [ रमेश तांबे ]

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखा पोलीस आणि घोडेगाव पोलीसा़ंनी अटक करून,त्याच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. राहुल अशोक दाते वय २५ वर्षे,रा.मंचर, ता.आंबेगाव जि.पुणे असे दुचाकी चोरणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीमध्ये मंचर, घोडेगाव, नारायणगाव, ओतूर या परिसरातून दुचाकी चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. सदर दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या सूचना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव शेलार,सहाय्यक फौजदार दीपक साबळे,पोलीस हवालदार संदीप वारे,अक्षय नवले हे सदर गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून पुढील तपास सुरू केला. सदर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता प्रत्येक ठिकाणी तोच चोरटा असल्याचे दिसून आले. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की सदर सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारा इसम हा रेकॉर्डवरील मोटरसायकल चोर राहुल अशोक दाते राहणार मंचर हा आहे. तसेच त्याच्यावर यापूर्वी देखील बरेच गुन्हे दाखल आहेत. तरी तो आज त्याच्या ताब्यातील चोरीच्या मोटरसायकल ह्या घोडेगाव नारोडी फाटा येथे विक्रीसाठी येणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदार मार्फत समजले त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने तसेच घोडेगाव पोलिस स्टेशन कडील पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून राहुल अशोक दाते यास ताब्यात घेतले.त्याच्या ताब्यातून घोडेगाव, मंचर, नारायणगाव,ओतूर या ठिकाणाहून चोरीस गेलेल्या चार मोटारसायकल तसेच नारायणगाव येथून चोरीस गेलेला एक मोबाईल असा १ लाख ११ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव शेलार,घोडेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार,पोलीस अंमलदार, दिपक साबळे, संदिप वारे,अक्षय नवले,राजु मोमीण,घोडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश पवार, पोलीस हवालदार अमरदीप वंजारी विठ्ठल वाघ,नीलेश तळपे, सावंत, कांबळे,पो.कॉ.तनपुरे, लगड, वायदंडे. तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे मंगेश लोखंडे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, टीलेश जाधव यांनी केली आहे. सदर आरोपीस पुढील तपास कामी घोडेगाव पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आला असून, पुढील तपास घोडेगाव पोलीस स्टेशन करत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ