Mango Eating Tips : आंबा खाताना या चुकीच्या सवयी ठरू शकतात धोकादायक

spot_img

उन्हाळा सुरू झाला की बाजारात विविध फळांची रेलचेल दिसते, मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेणारे फळ म्हणजे आंबा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे हे गोड आणि रसाळ फळ चवीबरोबरच आरोग्यासाठीही उपयुक्त ठरते. व्हिटॅमिन ए, बी6, सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरने समृद्ध असलेला आंबा शरीरासाठी फायदेशीर असला तरी त्याचे सेवन योग्य पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे.

आंबा खाताना काही साध्या चुका टाळल्या नाहीत, तर त्याचे दुष्परिणामही जाणवू शकतात. उदाहरणार्थ, आंबा खाण्यापूर्वी तो काही तास पाण्यात भिजवणे गरजेचे मानले जाते. त्यामुळे त्यातील उष्णतेचा परिणाम कमी होण्यास मदत होते.

याशिवाय, आंबा जास्त प्रमाणात खाणे टाळावे. मर्यादेपेक्षा जास्त सेवन केल्यास त्वचेवर मुरुम येणे किंवा शरीरात उष्णता वाढणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अतिसेवनामुळे पचनसंस्थेवरही ताण येऊन पोटाच्या तक्रारी जसे की लूज मोशन होण्याची शक्यता वाढते. रिकाम्या पोटी आंबा खाणेही टाळावे. कारण त्यातील नैसर्गिक साखर आणि फायबरमुळे अ‍ॅसिडिटी किंवा जळजळ होऊ शकते. तसेच, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, कारण आंब्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. म्हणूनच, आंब्याचा आनंद घेताना त्याचे योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत पाळल्यासच त्याचे खरे फायदे मिळू शकतात.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ