Sanjay raut : राहुरी आणि बारामतीमधील उमेदवारीचा सस्पेन्स कायम; संजय राऊतांनी मांडली मविआची स्पष्ट भूमिका

spot_img

महाविकास आघाडीचे ‘मिशन पोटनिवडणूक’: जागावाटपासाठी पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर आज खलबतं!

राज्यातील राहुरी आणि बारामती या दोन विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता महाविकास आघाडीत (मविआ) राजकीय हालचालींनी कमालीचा वेग घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आज दुपारी १ वाजता शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राहुरीच्या जागेसाठी शिवसेनेतही काही इच्छुकांची नावे चर्चेत असली, तरी मविआ म्हणून एकमतानेच निर्णय घेतला जाईल, असे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत.

दरम्यान, बारामतीच्या जागेबाबत सस्पेन्स कायम असून सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सुनेत्रा पवार या भाजपसोबत असल्याने त्या मविआच्या उमेदवार असू शकत नाहीत, असे राऊतांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, अजित पवार यांच्या निधनानंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी चर्चा असली तरी शरद पवारांनी मात्र लोकशाहीत निवडणूक होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. जे मतदार सत्ताधाऱ्यांवर नाराज आहेत, त्यांना त्यांचे मत मांडण्याची संधी मिळायला हवी, असे म्हणत पवारांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा मूळच्या राष्ट्रवादीच्या असल्याने त्याबाबतचा अंतिम शब्द शरद पवारांचाच असेल, असेही मविआतील मित्रपक्षांनी मान्य केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ