Mumbai Crime : मुंब्रात गोळीबाराची धक्कादायक घटना, वादात एकाचा मृत्यू

spot_img

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात गोळीबाराच्या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सुमनताई चव्हाण हिंदी प्राथमिक विद्यालयाजवळील कैलासनगर परिसरातील बिस्मिल्लाह चाळीत गुरुवारी सकाळी सुमारे ११:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जयंन शिवानंदन नायर (वय ५१) आणि मयत यांच्यात त्याच्या बहिणीच्या छेडछाडीच्या मुद्द्यावरून वाद झाला होता. हा वाद चिघळल्याने संतप्त झालेल्या नायरने अकबर अब्दुल शेख याच्यावर गोळीबार केला. या घटनेत अकबर अब्दुल शेख आणि अब्दुल हसन शेख हे दोघे गंभीर जखमी झाले.

जखमींना तातडीने काळसेकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच अकबर अब्दुल शेख यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

घटनेनंतर मुंब्रा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ