Raj Thackeray : रीलस्टारचा हरवलेला कॅमेरा 24 तासांत परत; मनसेने नर्गिसने मानले आभार

spot_img

सामान्य नागरिकांच्या अडचणीच्या वेळी राजकीय पक्षांनी मदतीला धावून यावे, अशी अपेक्षा अनेकदा व्यक्त केली जाते. मुंबईत एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला आलेल्या अनुभवामुळे ही बाब पुन्हा चर्चेत आली आहे. रीलस्टार नर्गिस फ्रूटवाला हिने आपला सुमारे 4 लाख रुपये किमतीचा कॅमेरा चुकून कॅबमध्ये विसरला. ही गोष्ट लक्षात येताच तिने कॅब चालकाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने कॅमेरा परत देण्यास नकार दिल्याचा आरोप तिने केला आहे.

यानंतर तिने चेंबूरमधील RCF आणि MIDC पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी चालकाला फोन केला असता त्याने “माझ्याकडे काही नाही” असे उत्तर दिले. त्यामुळे तक्रार नोंदवण्यातही अडचणी आल्याचे नर्गिसने सांगितले. शेवटी, ओळखीच्या व्यक्तीच्या सल्ल्यानुसार ती मनसेच्या शाखेत पोहोचली. मनसेचे वर्सोवा विधानसभा अध्यक्ष संदेश देसाई आणि शाखाध्यक्ष लक्ष्मण वाघमोडे यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली. त्यांनी नवी मुंबई परिसरात शोध घेत कॅब चालकाचा माग काढला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी चालकाच्या घरातून कॅमेरा हस्तगत केला.

अवघ्या 24 तासांत आपला कॅमेरा परत मिळाल्यानंतर नर्गिसने आनंद व्यक्त करत एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे, संदेश देसाई आणि इतर कार्यकर्त्यांचे आभार मानत, “जे काम पोलिसांनी केले नाही ते मनसेने केले,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ