Sanjay Raut : जैन मुनी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राऊत आक्रमक; शिंदे सरकारवर हल्लाबोल

spot_img

संजय राऊत यांनी महाराणी ताराराणी यांच्याबाबत झालेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विशेषतः निशाणा साधत, त्यांच्या उपस्थितीत इतिहासाचा विपर्यास होत असताना त्यांनी विरोध का केला नाही, असा सवाल उपस्थित केला.

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याची चर्चा होते, मात्र इथेच ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे “धर्मांतर” करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ताराराणी यांचा इतिहास बदलण्याचा अधिकार कुणाला दिला, असा तीव्र प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राऊत यांनी पुढे स्पष्ट केले की, ताराराणी या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी होत्या. अशा झुंजार वीरांगनेबद्दल चुकीची माहिती पसरवणे म्हणजे मराठा इतिहासाचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले.

तसेच, काहीजण मराठा इतिहासातील राजे-महाराजांना वेगळ्या धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका करत त्यांनी ही विचारधारा धोकादायक असल्याचे सांगितले. मराठा संघटना आणि मराठी अस्मितेचे पुरस्कर्ते यावर शांत का आहेत, असा सवालही त्यांनी केला.

शेवटी, या प्रकरणात केवळ निषेध नोंदवून चालणार नाही, तर ठोस कारवाई होणे आवश्यक असल्याचे राऊत यांनी ठामपणे सांगितले

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ