Akola Crime News : पोलीस कोठडीतील महिलेकडे पोलिस अधिकाऱ्यानेच केली शरीर सुखाची मागणी; अकोल्यातील धक्कादायक प्रकार

spot_img

अकोला येथे पोलिसांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गंभीर घटना उघडकीस आली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या एका महिला आरोपीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप ड्युटीवरील अधिकाऱ्यावर झाला आहे.

माहितीनुसार, राजेश जाधव नावाच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने लॉकअपमध्ये असलेल्या महिलेकडून शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. ही घटना सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये घडली असून, त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्याच्याविरोधात छेडछाडीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

ही महिला आर्थिक फसवणूक प्रकरणात अटकेत होती. आरोपानुसार, अधिकाऱ्याने तिच्या मुलीला पैशांच्या मोबदल्यात स्वतःकडे पाठवण्याची मागणी केली. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात मोठी खळबळ उडाली.

या प्रकाराची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पीडित महिलेचे म्हणणे ऐकून घेतले आणि संबंधित अधिकाऱ्यावर संताप व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओही समोर आल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून, पोलिसांच्या वर्तनाबाबत आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ