Ashok Kharat : अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; एसआयटी चौकशीत नवे खुलासे

spot_img

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 1 एप्रिल रोजी त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. ही सुनावणी न्यायाधीश बी. इन. ईचपुरानी यांच्या न्यायालयात पार पडली.

पोलीस कोठडी संपल्यानंतर खरातला पुन्हा कोर्टात आणण्यात आले. सध्या विशेष तपास पथक (SIT) त्याची चौकशी करत असून, तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. त्याच्याविरोधात लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक यांसारख्या गंभीर तक्रारींची संख्या वाढत आहे.

सुनावणीदरम्यान सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडली. न्यायालयाने कागदपत्रांची पाहणी करून निर्णय दिला. विशेष म्हणजे, ही प्रक्रिया अत्यंत जलद पार पडली आणि अवघ्या काही मिनिटांत कोर्टाने निकाल जाहीर केला.

या आधीही संबंधित प्रकरणात खरातला अनेक वेळा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, उद्या त्याला दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ