Visakhapatnam Crime : नौदलाच्या जवानाचा क्रूर ‘खिलाडी’; प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये लपवले!

spot_img

अनैतिक संबंध आणि साडेतीन लाखांच्या वादातून टोकाचे पाऊल; मिंगल अ‍ॅपवर झालेल्या ओळखीचा रक्तरंजित शेवट

विशाखापट्टणम येथील आयएनएस (INS) डेगावर तैनात असलेल्या नौदलाच्या एका जवानाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविंद्र (३०) असे या आरोपीचे नाव असून, त्याने मोनिका (३१) नावाच्या तरुणीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते फ्रिज आणि ट्रॉली बॅगेत लपवून ठेवले. २०२१ मध्ये एका डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाली होती, ज्याचे रूपांतर पुढे अनैतिक संबंधांत झाले. मात्र, हेच प्रेमप्रकरण अखेर मोनिकासाठी मृत्यूचा सापळा ठरले. पत्नी माहेरी गेल्याची संधी साधून रविंद्रने मोनिकाला घरी बोलावले आणि वादाचे रूपांतर थेट हत्येत झाले.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रविंद्रचे २०२४ मध्ये लग्न झाले होते, तरीही त्याचे मोनिकाशी संबंध सुरूच होते. मोनिकाने रविंद्रकडून साडेतीन लाख रुपये घेतले होते आणि ती हे संबंध त्याच्या पत्नीला सांगण्याची सतत धमकी देत होती. या त्रासाला कंटाळून रविंद्रने तिची हत्या करण्याचा कट रचला. हत्येनंतर त्याने ऑनलाइन चाकू मागवून मृतदेहाचे तुकडे केले; धड फ्रिजमध्ये ठेवले, पाय बॅगेत भरले तर डोके आणि हात वेगळ्या ठिकाणी नेऊन जाळले. धक्कादायक म्हणजे, हा अमानुष गुन्हा केल्यानंतर आरोपीने स्वतः पोलीस स्टेशन गाठून गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना फ्रिजमध्ये मृतदेहाचे तुकडे आढळले असून, या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ