Mamta Shivatare : लेकीने दिले वडिलांना नवजीवन; ममता शिवतारे यांचा किडनीदानाचा भावनिक निर्णय

spot_img

आमदार विजय शिवतारे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; बाप-लेकीच्या नात्याची राज्यभर चर्चा.

बाप आणि मुलीचं नातं हे प्रेम, जिव्हाळा आणि त्यागाने भरलेलं असतं. याच नात्याचं हृदयस्पर्शी उदाहरण सध्या समोर आलं आहे. विजय शिवतारे यांना त्यांच्या लेकीनेच नवजीवन दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे काही काळापासून किडनी निकामी झाल्यामुळे डायलिसिसवर होते. त्यांची प्रकृती हळूहळू खालावत चालली होती. अशा गंभीर परिस्थितीत त्यांच्या मदतीला त्यांच्या मुली डॉ. ममता शिवतारे पुढे आल्या. त्यांनी वडिलांना स्वतःची किडनी दान करण्याचा मोठा निर्णय घेतला.

मुंबईत पार पडलेल्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. डॉक्टर असलेल्या ममता यांनी केवळ आपलं कर्तव्य पार पाडलं नाही, तर वडिलांप्रती असलेलं अपार प्रेम आणि समर्पणही दाखवून दिलं आहे.

या घटनेमुळे बाप-लेकीच्या नात्याची एक वेगळीच बाजू समोर आली असून, हा त्याग केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित न राहता संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. अनेक जण ममता यांच्या या निर्णयाचे कौतुक करत असून, त्यांच्या कृतीतून नात्यांतील खरी माया आणि मानवतेचा संदेश अधोरेखित होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ