Parth Pawar Meets Raj Thackeray : शिवतीर्थावर पार्थ पवार आणि राज ठाकरे यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

spot_img

भेटीमागील कारण अद्याप अस्पष्ट; राज्यसभेच्या चर्चांमुळे तर्क-वितर्कांना उधाण.

महाराष्ट्राच्या राजकारणात आज पार्थ पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झालेली भेट चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. पार्थ पवार अचानक शिवतीर्थ येथे पोहोचले आणि त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध अंदाज वर्तवले जात आहेत.

याआधी काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनीही शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र, या सलग भेटींचा नेमका उद्देश काय आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

आजच्या भेटीनंतर पार्थ पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता थेट निघून गेल्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आले आहे. त्यामुळे या भेटीमागील कारण अद्याप गूढच आहे.

दरम्यान, राजकीय वर्तुळात पार्थ पवार यांचे नाव राज्यसभेसाठी पुढे येत असल्याची चर्चा सुरू आहे. सुनेत्रा पवार यांच्या जागी त्यांना संधी मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ