Health Tips : गव्हाची पोळी सोडा आणि ‘या’ धान्यांचा करा समावेश

spot_img

पोटातील जळजळ अन् उष्णतेपासून मिळेल कायमची सुटका

मार्च महिना सुरू होताच सूर्याने आपले प्रखर रूप दाखवायला सुरुवात केली आहे. अशा वाढत्या उन्हात केवळ पाणी पिणे पुरेसे नसून, आपल्या आहारात बदल करणेही तितकेच गरजेचे आहे. प्रसिद्ध मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी नुकतीच एक महत्त्वाची माहिती शेअर केली असून, ऋतूंनुसार आपण कोणती भाकरी खाल्ली पाहिजे, यावर प्रकाश टाकला आहे. उन्हाळ्यात शरीर आतून थंड ठेवण्यासाठी गव्हाच्या पोळीपेक्षा बार्ली (जव), नाचणी आणि ज्वारीची भाकरी अत्यंत फायदेशीर ठरते. बार्लीची भाकरी पचनासाठी हलकी असून शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवते, तर नाचणीमुळे शरीराला कॅल्शियम मिळण्यासोबतच ॲसिडिटीचा त्रास कमी होतो.

केवळ भाकरीच नाही, तर उन्हाळ्यात भाज्या आणि फळांची निवडही विचारपूर्वक करायला हवी. आहारात दुधी भोपळा, काकडी, पडवळ आणि पालकासारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भाज्यांचा समावेश करावा. तसेच दही, ताक आणि लिंबूपाणी यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. मास्टरशेफ सांगतात की, हिवाळ्यात बाजरी किंवा मक्याची भाकरी उष्णता देण्यासाठी चांगली असते, मात्र उन्हाळ्यात ती टाळलेलीच बरी. त्याऐवजी हलका आहार, ताजी फळे आणि पुरेसे पाणी घेतल्यास आपण उन्हाळ्यातील थकवा आणि उष्माघातापासून स्वतःचा बचाव करू शकतो.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ