Ahilyanagar : पोटच्या जावयाचा सासऱ्याच्या दारात ‘नरभक्षक’ जादूटोणा!

spot_img

मयत पत्नीच्या माहेरी मध्यरात्री तांत्रिक विधीचा घाट; चिमुकल्याच्या ताब्यासाठी की सुडासाठी? राहुरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

संपूर्ण महाराष्ट्र सध्या भोंदू बाबा अशोक खरातच्या लैंगिक शोषणाच्या विकृत कहाण्यांनी सुन्न असतानाच, अहिल्यानगर जिल्ह्यातून काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे एका जावयाने चक्क आपल्या सासऱ्याच्या घरासमोर मध्यरात्रीच्या अंधारात जादूटोणा करण्याचा अघोरी प्रयत्न केला. टाचण्या टोचलेली लिंबे, काळी बाहुली, हळद-कुंकू आणि बुलेटजवळ सापडलेली कुऱ्हाड… या भयावह साहित्यासह आरोपी जावई वि विशाल लांडगे याला सासऱ्याने रंगेहात पकडले, तर त्याचे तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

या घटनेमागील पार्श्वभूमी अत्यंत विदारक आहे. आरोपी विशालची पत्नी पूनम हिचा २०२५ मध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता, ज्याप्रकरणी विशाल आणि त्याच्या पालकांना तुरुंगाची हवाही खावी लागली होती. सध्या पूनमचा तीन वर्षांचा चिमुकला मुलगा आपल्या आजी-आजोबांकडे (पठाडे कुटुंब) राहत आहे. “तो आम्हाला मारण्यासाठी आणि बाळाला पळवण्यासाठीच हे तांत्रिक प्रयोग करत होता,” असा खळबळजनक आरोप मयत पूनमच्या आईने केला आहे. एका बाजूला जग विज्ञानाची कास धरत असताना, पोटच्या जावयानेच खुनशी वृत्तीतून अंधश्रद्धेचा आधार घेतल्याने परिसरात संतापाची लाट आहे. राहुरी पोलिसांनी याप्रकरणी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या’नुसार गुन्हा दाखल केला असून, या काळ्या कृत्यामागे नक्की कोणता ‘मास्टरमाइंड’ आहे, याचा तपास आता वेगाने सुरू आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ