World Masters Championship 2026 : थायलंड येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शरद माळवे यांना सुवर्णपदक

spot_img

लांब उडी आणि तिहेरी उडीत सुवर्णवेध; भारतीय तिरंगा जागतिक स्तरावर अभिमानाने फडकला

ओतूर,प्रतिनिधी:दि.२४ एप्रिल [ रमेश तांबे ]

थायलंडमधील शीराचा येथे पार पडलेल्या ‘जागतिक मास्टर्स चॅम्पियनशिप २०२६’ या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत डिंगोरे (ता. जुन्नर) येथील पुष्पावती विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद माळवे यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ५० ते ५५ वर्षे वयोगटात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना माळवे यांनी आपल्या कौशल्याने सर्वांना थक्क केले. त्यांनी लांब उडी आणि तिहेरी उडी या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक मिळवून भारताचा गौरव वाढवला.

या जागतिक स्पर्धेत भारत, मलेशिया, श्रीलंका, म्यानमार यांसह अनेक देशांतील मातब्बर खेळाडू सहभागी झाले होते. भारतीय ३० खेळाडूंच्या पथकात माळवे यांनी आपल्या चिकाटीच्या जोरावर ही पदकांची लयलूट केली. त्यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी, ओतूर ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमींकडून त्यांचे कौतुक होत आहे. वयाच्या पन्नाशीनंतरही दाखवलेली ही जिद्द तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत असून, जुन्नरच्या मातीचा सुगंध आता आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात दरवळला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ