Weight Loss Drinks : कठोर डाएटिंगशिवाय घटवा वजन; रात्री झोपण्यापूर्वी ‘ही’ ५ आरोग्यदायी पेये पिण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

spot_img

थकवा न येता शरीरातील अतिरिक्त चरबी विरघळणार आणि पचनक्रियाही सुधारणार; फिटनेस ट्रेनर अमारा यांनी सांगितली सोपी युक्ती

आजच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत वाढते वजन ही अनेकांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरत आहे. वजन जितक्या वेगाने वाढते, तितकेच ते कमी करण्यासाठी घाम गाळावा लागतो. वजन नियंत्रणात आणण्यासाठी अनेक जण जिममध्ये तासनतास व्यायाम करतात किंवा खाण्यापिण्यात अचानक मोठा बदल (कठोर डाएटिंग) करतात. मात्र, यामुळे अनेकदा शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता होऊन कमालीचा थकवा जाणवू लागतो. या समस्येवर एक सोपा आणि प्रभावी उपाय फिटनेस ट्रेनर अमारा यांनी सुचवला आहे. त्यांच्या मते, स्वतःला उपाशी ठेवण्याऐवजी रात्री झोपण्यापूर्वी काही विशेष आरोग्यदायी पेयांचे (Health Drinks) सेवन केल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी सहज कमी करता येते. ही पेये रात्री झोपेत असताना शरीराची चयापचय क्रिया (Metabolism) वाढवण्यास आणि पचनसंस्था सुदृढ ठेवण्यास मदत करतात.

वजन कमी करण्यासाठी रात्री उपयुक्त ठरणारी ५ पेये खालीलप्रमाणे:

  • कोमट पाणी आणि लिंबाचा रस: रात्री झोपण्याच्या साधारण २० ते ३० मिनिटे आधी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस पिळून प्यायल्याने पचनक्रिया वेगवान होते. यामुळे सकाळी पोट साफ होते, गॅस किंवा पोट फुगण्याची समस्या दूर होते आणि शरीरातील नको असलेली चरबी कमी होण्यास मदत होते.
  • दालचिनीचे पाणी: दालचिनी शरीरातील रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar) नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते. ती रात्रीच्या वेळी लागणारी अवाजवी भूक शमवते आणि झोपेतच फॅट बर्निंग प्रक्रियेला गती देते. हे पेय तयार करण्यासाठी एका ग्लास पाण्यात दालचिनीची पावडर किंवा छोटा तुकडा टाकून ते ५ मिनिटे उकळवून घ्यावे.
  • आले आणि ग्रीन टी: पोटाचा घेर कमी करण्यासाठी आल्याचा चहा हा एक उत्तम पर्याय आहे. एका ग्लास उकळत्या पाण्यात किसलेले आले टाकून त्यात ग्रीन टी बॅग काही वेळ भिजवून ठेवावी. हे मिश्रण गाळून प्यायल्याने रात्री शांत झोप लागते आणि वजन वेगाने घटते.
  • अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि आले: हे पेय शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर टाकण्यासाठी डिटॉक्स ड्रिंक म्हणून काम करते. एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि थोडे किसलेले आले मिसळून झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी प्यायल्याने पचनशक्ती मजबूत होते.
  • कॅमोमाईल टी (Chamomile Tea): हा एक उत्कृष्ट हर्बल चहा आहे जो मनाला आणि शरीराला आराम देऊन गाढ झोप येण्यास मदत करतो. वजनाचा थेट संबंध झोपेशी असतो; पुरेशी आणि चांगली झोप मिळाल्यास शरीराची चयापचय क्रिया व्यवस्थित कार्य करते, जी वजन कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. एका ग्लास गरम पाण्यात ही टी बॅग ५ मिनिटे ठेवून हा चहा तयार करता येतो. मात्र, तुम्हाला आधीच काही वैद्यकीय समस्या किंवा आजार असल्यास, या पेयांचे सेवन सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा.
हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ