Washignton Hilton Hotel Shooting : सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार विजेत्यानं व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनरमध्ये का केला गोळीबार?

spot_img

वॉशिंग्टन डी.सी. येथील व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनर दरम्यान झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. हॉटेलमध्ये गोळीबार करणाऱ्या संशयिताची ओळख कोल थॉमस ॲलन अशी पटली असून, तो दक्षिण कॅलिफोर्नियातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. या घटनेवेळी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गोळीबारानंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने कारवाई करत ॲलनला अटक केली.सीबीएस च्या वृत्तानुसार, चौकशीदरम्यान ॲलनने अधिकाऱ्यांसमोर कबूल केले की त्याचा उद्देश ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याचा होता. या प्रकरणात त्याला 27 एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

घटनेनंतर ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेतली आणि संशयित मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचा दावा केला. दरम्यान, तपास यंत्रणांनी ॲलनच्या पार्श्वभूमीची सखोल चौकशी सुरू केली आहे. सार्वजनिक नोंदींनुसार, 31 वर्षीय ॲलन हा टॉरन्स परिसरात राहत होता. तो व्यवसायाने शिक्षक तसेच व्हिडिओ गेम डेव्हलपर होता.

त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तो C2 एज्युकेशन या शिकवणी संस्थेत अर्धवेळ शिक्षक म्हणून कार्यरत होता. विशेष म्हणजे, डिसेंबर 2024 मध्ये त्याला ‘सर्वोत्तम शिक्षक’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. या पार्श्वभूमीमुळे या प्रकरणाने अधिकच धक्का दिला आहे.

ही घटना पुन्हा एकदा अमेरिकेतील गन कंट्रोल, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि मानसिक आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ