Priyanka Chaturvedi On Donald Trump : वॉशिंग्टनमध्ये घडलेल्या गोळीबाराच्या घटनेवर प्रियंका चतुर्वेदी यांचे ट्विट चर्चेत

spot_img

वॉशिंग्टन डी.सी. येथे पार पडणाऱ्या प्रतिष्ठित व्हाईट हाऊस करस्पाँडेंट्स डिनर दरम्यान एक धक्कादायक घटना घडली. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प उपस्थित असताना हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हा प्रकार हॉटेलच्या बॉलरूमच्या वरच्या मजल्यावर घडला असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर अमेरिकेच्या ‘सीक्रेट सर्व्हिस’ने तातडीने हालचाल करत ट्रम्प दाम्पत्याला सुरक्षित स्थळी हलवले. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसर ताब्यात घेण्यात आला आणि संशयित हल्लेखोराला जिवंत पकडण्यात आले. सुदैवाने, या घटनेत ट्रम्प दाम्पत्याला कोणतीही इजा झाली नाही, ज्यामुळे जागतिक पातळीवर काहीसा दिलासा व्यक्त करण्यात आला.

या घटनेनंतर भारतासह जगभरातून विविध प्रतिक्रिया उमटल्या. विशेषतः प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने लक्ष वेधले.प्रियंका चतुर्वेदी यांनी पुन्हा एक पोस्ट केली. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला नरक म्हणून संबोधले होते. या विधानाचा प्रियंका चतुर्वेदी यांनी समाचार घेतला. अमेरिकेतील बंदुकांची समस्या अत्यंत गंभीर आहे. हा असा एक मुद्दा आहे जो बंदुकांसंबंधी एखादी घटना घडल्यानंतर दरवर्षी चर्चेत येतो.बंदूक हिंसाचाराचा सामना करण्याच्या बाबतीत, अमेरिका स्वतःच प्रभावीपणे एक ‘नरक’ बनली आहे, अशा शब्दात प्रियंका चतुर्वेदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ