Vikas Lawande : विकास लवांडे यांना अटक,वाघोली पोलिसांची कारवाई

spot_img

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे हे गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे सतत चर्चेत राहिले आहेत. वारकरी संप्रदायात काही व्यक्तींनी घुसखोरी केल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी काही वारकऱ्यांची यादी जाहीर केली होती. त्यांच्या या विधानामुळे राज्यभरात मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक वारकरी संघटना, धार्मिक संस्था आणि संतप्रेमींनी या वक्तव्याचा तीव्र निषेध करत संताप व्यक्त केला होता. सामाजिक आणि राजकीय स्तरावर या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली होती.

वाद वाढत असतानाच काही दिवसांपूर्वी विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर हे प्रकरण अधिकच गाजले. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लवांडे यांचा दुग्धाभिषेक करून त्यांना पाठिंबा दर्शवला होता. या प्रकारामुळे विरोधकांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

दरम्यान, आता या संपूर्ण प्रकरणात नवे वळण आले असून वाघोली पोलिसांनी विकास लवांडे यांना अटक केली आहे. पोलिसांकडून अटकेमागील अधिकृत कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नसले, तरी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. लवांडेंच्या अटकेनंतर राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

या कारवाईनंतर समर्थक आणि विरोधक आमनेसामने आले असून सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आगामी काळात या प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ