Tamil Nadu-West Bengal By Elections : पश्चिम बंगालमध्ये उमेदवारावर हल्ला, हिंसाचार आणि तक्रारींची मालिका

spot_img

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध भागांत भारतीय जनता पक्ष आणि ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला. दक्षिण मिदनापूरमधील कुमारगंज मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुवेंदू सरकार यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली. एका व्हिडिओमध्ये ते हल्लेखोरांपासून बचाव करण्यासाठी पळताना दिसतात. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक असतानाही जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसून, निवडणूक आयोगाने व्हिडिओतील संबंधितांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. मतदान सुरू होण्यापूर्वीच मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नौदा येथे कच्च्या बॉम्बची घटना घडली, ज्यात काही लोक जखमी झाले. या घटनेनंतर हुमायून कबीर घटनास्थळी पोहोचले असता त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. त्यांनी तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप करत आंदोलन छेडले.

याशिवाय, सिलिगुडी आणि मालदा येथेही संघर्ष व गोंधळाच्या घटना घडल्या. मालद्यात एका मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत आंदोलन केले. दरम्यान, तमिलनाडू मध्येही सर्व २३४ जागांसाठी मतदान सुरू असून, दोन्ही राज्यांमध्ये मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत बंगालमध्ये सुमारे ४१.११ टक्के, तर तामिळनाडूमध्ये ३७.५६ टक्के मतदान झाले आहे. मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्या असून, विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. बंगालमध्ये मुख्य सामना अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात होत असून, निवडणूक आयोग वेबकास्टिंगच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवत आहे. उर्वरित १४२ जागांसाठी २९ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून, ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ