Numerology : मे महिन्यात ‘या’ मूलांकांच्या व्यक्तींनी राहावे सावध; कोणत्या मूलांकांसाठी कठीण काळ?

spot_img

अंकज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा मूलांक निश्चित केला जातो. या मूलांकाच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, निर्णयक्षमता, करिअर आणि आगामी काळातील परिस्थितीबाबत अंदाज व्यक्त केला जातो. मे २०२६ हा महिना काही विशिष्ट मूलांकांच्या लोकांसाठी आव्हानांनी भरलेला ठरू शकतो, असे अंकज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः मूलांक ३, ७ आणि ९ असलेल्या व्यक्तींनी या काळात अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

मूलांक ३
ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ किंवा ३० तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ३ मानला जातो. या लोकांनी मे महिन्यात करिअर आणि आर्थिक व्यवहारांबाबत अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. घाईगडबडीत घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरू शकतात. नवीन गुंतवणूक किंवा मोठे व्यवहार टाळणे फायदेशीर ठरेल. या काळात संयम राखणे आणि प्रत्येक गोष्ट नीट तपासून पुढे जाणे गरजेचे आहे.

मूलांक ७
७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ७ असतो. या लोकांनी मे महिन्यात भावनिक निर्णय घेणे टाळावे. कोणावरही अति विश्वास ठेवणे नुकसानदायक ठरू शकते. आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पैशांची उधारी किंवा मोठी देवाणघेवाण टाळल्यास संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते.

मूलांक ९
९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींनी या महिन्यात आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. बोलण्यात कठोरपणा आल्यास नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. मानसिक तणावाचा परिणाम आरोग्यावरही होण्याची शक्यता असल्याने योग, ध्यान आणि शांत राहण्यावर भर देण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ