Jai Gidwani From Shakti Film : शक्ती’मधील तो चिमुकला आता परदेशात कमावतोय कोट्यवधी

spot_img

नाना पाटेकर आणि शाहरुख खानच्या सिनेमातील ‘राजा’ आता झालाय मोठा बिझनेसमन

बॉलिवूडमध्ये अनेक बालकलाकार येतात आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकतात, मात्र त्यातील काही जण ग्लॅमरच्या दुनियेला रामराम ठोकून वेगळी वाट निवडतात. २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शक्ती: द पॉवर’ या चित्रपटात करिश्मा कपूरच्या मुलाची म्हणजे ‘राजा’ची भूमिका साकारणारा तो निरागस मुलगा तुम्हाला आठवत असेलच. आज तो मुलगा अभिनयापासून दूर असला तरी उद्योगविश्वात त्याचे नाव मोठे झाले आहे. या बालकलाकाराचे नाव जय गिडवाणी असून, त्याने चित्रपटात नाना पाटेकर आणि शाहरुख खान यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले होते. जरी ‘शक्ती’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही, तरी जयने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मात्र, या सिनेमानंतर जयने अभिनयाला पूर्णविराम दिला आणि आपले लक्ष शिक्षणावर केंद्रित केले.

जय गिडवाणी आता भारतात नसून स्पेनमधील ग्रॅन कॅनरिया येथे स्थायिक झाला आहे. तिथे त्याने स्वतःचे साम्राज्य उभे केले असून तो एक यशस्वी आणि नावाजलेला उद्योजक बनला आहे. रिपोर्टनुसार, जय आता डॉलर्समध्ये कमाई करत असून अत्यंत लॅविश आणि आलिशान जीवन जगत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या जयच्या फोटोंवरून त्याच्या बदलेल्या लूकचा आणि यशाचा अंदाज येतो. ज्या मुलाला आपण पडद्यावर संकटात पाहिले होते, तोच मुलगा आज खऱ्या आयुष्यात उद्योजक म्हणून परदेशात भारताचे नाव मोठे करत आहे. ‘शक्ती’ चित्रपट करिश्मा कपूरच्या करिअरमधील एक महत्त्वाचा सिनेमा मानला जातो, पण तिच्या ऑनस्क्रीन मुलाने निवडलेली ही यशाची ‘पॉवरफुल’ वाट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ