IPL 2026 Points Table : गुणतालिकेत सनरायझर्स हैदराबादची सातव्या क्रमांकावरून थेट ” या” स्थानी झेप

spot_img

आयपीएल २०२६ च्या १९ व्या मोसमात सोमवारी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या २१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने टेबल टॉपर राजस्थान रॉयल्सचा ५७ धावांनी धुव्वा उडवला. हैदराबादचा या मोसमातील हा दुसरा विजय असून, त्यांनी राजस्थानची विजयी घोडदौड रोखली आहे. कर्णधार इशान किशनच्या वादळी ९१ धावांच्या जोरावर हैदराबादने २१७ धावांचे डोंगर उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ हैदराबादच्या अचूक गोलंदाजीसमोर पूर्णपणे कोलमडला आणि १९ व्या षटकात १५९ धावांवरच ऑलआऊट झाला.

या विजयाचा हैदराबादला गुणतालिकेत (Points Table) प्रचंड फायदा झाला आहे. सामना सुरू होण्यापूर्वी सातव्या क्रमांकावर असलेला हैदराबादचा संघ आता थेट चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. हैदराबादच्या खात्यात ४ गुण जमा झाले असून त्यांच्या नेट रनरेटमध्येही (+०.५७६) मोठी सुधारणा झाली आहे. विशेष म्हणजे, पराभवानंतरही राजस्थान रॉयल्स अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे, तर पंजाब किंग्स दुसऱ्या आणि गतविजेता आरसीबी तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहेत.

गुणतालिकेच्या तळाला नजर टाकल्यास, मुंबई इंडियन्स आठव्या तर चेन्नई सुपर किंग्स नवव्या क्रमांकावर संघर्ष करत आहेत. कोलकाता नाईट रायडर्सची अवस्था बिकट असून, या मोसमात अद्याप एकही विजय न मिळवल्याने ते दहाव्या स्थानावर आहेत. हैदराबादच्या या ‘कमबॅक’मुळे आता आयपीएलमधील स्पर्धेची रंगत अधिकच वाढली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ