Thane : ठाणे-मुलुंडकरांचा वनवास संपणार नव्या रेल्वे स्थानकासाठी २५६ कोटींचा ‘ग्रीन सिग्नल’!

spot_img

ठाणे मनोरुग्णालयाच्या जागेवर साकारणार हायटेक स्थानक; २०२९ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी, विशेषतः ठाणे आणि मुलुंडकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ठाणे-मुलुंड दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. रेल्वे बोर्डाने या प्रकल्पासाठी २५६ कोटी रुपयांच्या भरीव निधीला अधिकृत मंजुरी दिली असून, कागदावर असलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्ष जमिनीवर उतरणार आहे.

ठाणे स्थानकावरील वाढती गर्दी आणि प्रवाशांची होणारी ओढाताण लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. ठाणे मनोरुग्णालयाच्या सुमारे १४.८३ एकर जागेवर हे अत्याधुनिक स्थानक उभारले जाणार आहे. या स्थानकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ रेल्वे रुळच नव्हे, तर तळमजल्यासह दोन मजली भव्य इमारत आणि प्रवाशांच्या सोयीसाठी तीन प्लॅटफॉर्म्स असतील.

प्रवाशांना स्थानकाबाहेर पडल्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, यासाठी १५० मीटर लांब ‘सॅटिस’ (SATIS) डेक आणि अडीच एकर जागेवर भव्य पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या नियोजनानुसार, सर्व कामे वेळेत पूर्ण झाल्यास २०२९ पर्यंत हे स्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. या नव्या स्थानकामुळे ठाणे आणि मुलुंड या दोन्ही स्थानकांवरील ताण कमालीचा कमी होणार असून, परिसरातील दळणवळणाला नवी गती मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ