Indonesia Torpedo News : इंडोनेशियात सापडलेल्या उपकरणाने भारताची उडाली झोप

spot_img

होर्मुज बंदरात चिनी निगराणी यंत्र जाळ्यात अडकले; हिंदी महासागरातील भारताच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह

इराण-अमेरिका तणावामुळे जग आधीच अस्थिर असताना, भारताच्या चिंतेत भर टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंडोनेशियातील लोम्बोक येथील होर्मुज बंदराजवळ एका मच्छीमाराच्या जाळ्यात ‘टॅर्पिडो’सारखे दिसणारे एक संशयास्पद उपकरण सापडले आहे. संरक्षण तज्ज्ञांनी केलेल्या तपासणीत हे उपकरण चीनची प्रगत ‘पाण्याखालील निगराणी प्रणाली’ (Underwater Surveillance System) असल्याचे निष्पन्न झाले आहे. चिनी ७१० संशोधन संस्थेने विकसित केलेले हे यंत्र समुद्रतळाशी राहून पाण्याची खोली, प्रवाहांचा वेग आणि सागरी हालचालींची ‘रिअल टाइम’ माहिती थेट शत्रू देशापर्यंत पोहोचवते. चीनच्या या गुप्त हेरगिरीचा पर्दाफाश झाल्याने आता संपूर्ण आशिया खंडात खळबळ उडाली आहे.

हे उपकरण इंडोनेशियात सापडले असले तरी, याचे सर्वात मोठे सावट भारतावर आहे. जर चीन इंडोनेशियाच्या सागरी हद्दीत अशी यंत्रे बसवू शकतो, तर भारताच्या विशाल सागरी सीमांमध्येही अशा प्रकारची गुप्त यंत्रे पेरली असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. चीनच्या या रणनीतीमागे ‘मलाक्का सामुद्रधुनी’ची भीती असल्याचे सांगितले जाते. चीनचा ८० टक्के तेलपुरवठा याच मार्गावरून होतो; उद्या जर युद्धजन्य परिस्थितीत भारताने हा मार्ग रोखला, तर चीनची अर्थव्यवस्था कोलमडू शकते. याच धास्तीपोटी चीन आता समुद्रतळापासून हेरगिरी करत असून, भारताच्या नौदलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा हा एक मोठा कट असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. ही घटना भारताच्या सागरी सुरक्षेसाठी एक धोक्याची घंटा मानली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ