Times Square Shooting : अमेरिकेत खळबळ! ‘न्यूयॉर्क निक्स’च्या जल्लोषात टाइम्स स्क्वेअरवर अंदाधुंद गोळीबार

spot_img

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने भारताला मोठा दिलासा; मात्र न्यूयॉर्कच्या लोअर मॅनहॅटनमध्ये परेडदरम्यान गोळ्या झाडल्याने नागरिक भयभीत, संशयित ताब्यात.

जागतिक पातळीवर एकीकडे अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील प्रदीर्घ काळ चाललेले युद्ध अखेर संपले असून दोन्ही देशांमध्ये युद्धविराम करार (Ceasefire Agreement) झाला आहे. अमेरिकेने इराणच्या काही प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर या युद्धाला पूर्णविराम मिळाला. या युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले होते, ज्याचा थेट फटका भारतासह अनेक देशांना बसून महागाई प्रचंड वाढली होती. मात्र, आता युद्ध थांबताच कच्च्या तेलाच्या किमती घसरू लागल्याने जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु, या आंतरराष्ट्रीय शांततेच्या वातावरणातच अमेरिकेतून एक हादरवून टाकणारी अंतर्गत सुरक्षेची घटना समोर आली आहे. न्यूयॉर्क शहरातील गजबजलेल्या टाइम्स स्क्वेअर (Times Square) परिसरामध्ये एकापाठोपाठ एक झालेल्या गोळीबारामुळे प्रचंड थरकाप उडाला आहे.

न्यूयॉर्क अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (NBA) मध्ये न्यूयॉर्क निक्स (New York Knicks) या संघाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी लोअर मॅनहॅटनच्या रस्त्यांवर लाखो लोकांचा जनसागर उसळला होता. या भव्य विजय परेडदरम्यान अचानक गोळीबाराचा आवाज घुमला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये गोळीबाराचा आवाज स्पष्ट ऐकू येत असून, त्यानंतर नागरिक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावताना दिसत आहेत. या कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी आधीच १०,००० पोलीस तैनात करण्यात आले होते, त्यामुळे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून एका संशयित हल्लेखोराला घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे.

गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या क्रीडा महोत्सवाच्या सांगतेवेळी झालेल्या या हिंसक घटनेने अमेरिकेतील गन कल्चर आणि सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला आहे. सुदैवाने पोलिसांनी वेळेत नियंत्रण मिळवल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी या घटनेमुळे टाइम्स स्क्वेअर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ