आसामच्या राजकारणात आज महत्त्वाचा दिवस मानला जात असून, हिमंत सरमा पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. गुवाहाटीतील खानापारा परिसरात आयोजित करण्यात आलेला हा भव्य शपथविधी सोहळा देशभरातील राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे विशेष चर्चेत आला आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली असून, आसाममध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या सोहळ्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ नेते गुवाहाटीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच एकनाथ शिंदे यांनीही उपस्थिती लावली आहे. शिंदे हे काल रात्रीच गुवाहाटीत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय, सुनेत्र पवार यांच्यासोबत पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे नेतेही आसाम दौऱ्यावर आहेत. बंगालमधील राजकीय घडामोडींनंतर आता आसाममधील हा शपथविधी सोहळा राष्ट्रीय राजकारणात विशेष महत्त्वाचा मानला जात असून, संपूर्ण देशाचे लक्ष गुवाहाटीकडे लागले आहे.




