DCM Eknath Shinde : मयंक लोहार हत्याप्रकरणी राज्यभर संताप; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कुटुंबीयांना न्यायाचे आश्वासन

spot_img

मुंबई लोकल ट्रेनमध्ये २२ वर्षीय मयंक लोहार यांच्या झालेल्या हत्येच्या घटनेने राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मयंकचे वडील रमेश लोहार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी मयंकला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. तसेच या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री स्तरावरही चर्चा केली जाईल, असे आश्वासन त्यांनी कुटुंबीयांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

दूरध्वनीवरील संवादादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मयंकच्या वडिलांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला असून, आरोपीला केवळ कठोर शिक्षा न देता थेट फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी ठाम मागणी रमेश लोहार यांनी केली. या घटनेमुळे कुटुंबीयांसह परिसरातही शोककळा पसरली असून, अनेक नागरिकांनी या हत्येचा निषेध व्यक्त केला आहे.

मुंबई लोकलसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील तपास आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, मयंकला न्याय मिळावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ