Phone Overheating : उन्हाळ्यात फोन पटकन गरम होतोय? ‘ओव्हरहीटिंग’ टाळण्यासाठी जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

spot_img

उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानाचा परिणाम आता केवळ शरीरावरच नाही, तर स्मार्टफोनवरही दिसून येत आहे. अनेकांना फोन वापरताना तो अचानक गरम होणे, चार्जिंगदरम्यान तापमान वाढणे किंवा गेम खेळताना फोन हँग होण्याच्या समस्या जाणवत आहेत. तज्ज्ञांच्या मते, मोबाईलचे ‘ओव्हरहीटिंग’ वेळेत नियंत्रणात न ठेवल्यास बॅटरी, प्रोसेसर आणि इतर अंतर्गत भागांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात फोन वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

फोन गरम होण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे थेट सूर्यप्रकाश. अनेकजण बाहेर उन्हात फोनचा सतत वापर करतात किंवा गाडीत फोन ठेवतात. मात्र, बंद गाडीत तापमान झपाट्याने वाढत असल्याने फोनचे नुकसान होण्याचा धोका अधिक वाढतो. याशिवाय जाड रबर किंवा प्लास्टिकचे कव्हर वापरल्याने फोनमधील उष्णता बाहेर पडत नाही आणि त्यामुळे फोन अधिक गरम होऊ शकतो. त्यामुळे फोन जास्त तापत असल्यास काही वेळासाठी कव्हर काढून ठेवणे फायदेशीर ठरते.

तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात सतत गेमिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग किंवा सोशल मीडियावरील रील्स पाहणे टाळावे. अशा गोष्टींमुळे फोनच्या प्रोसेसरवर अतिरिक्त ताण येतो आणि मोबाईलचे तापमान झपाट्याने वाढते. त्याचबरोबर फोन सतत १०० टक्के चार्ज करण्याऐवजी ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत चार्ज करणे अधिक सुरक्षित मानले जाते.

फोन थंड ठेवण्यासाठी ब्राइटनेस कमी ठेवणे किंवा ऑटो ब्राइटनेस सुरू करणे उपयुक्त ठरू शकते. गरज नसताना GPS, Bluetooth आणि Wi-Fi बंद ठेवणेही आवश्यक आहे. तसेच बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेले अनावश्यक अ‍ॅप्स बंद केल्यास फोनवरील ताण कमी होतो. नियमित सॉफ्टवेअर अपडेट्समुळेही Heating Problem कमी करण्यासाठी मदत मिळते.

जर फोन खूप गरम झाला असेल, तर तो काही वेळ बंद करून सावलीत ठेवणे उत्तम पर्याय आहे. मात्र, फोन पटकन थंड करण्यासाठी तो फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक अजिबात करू नये, कारण त्यामुळे फोनच्या आतील पार्ट्सना गंभीर नुकसान होऊ शकते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ