Govinda Krushna Abhishek Reunion : गोविंदा कुटुंबातील ‘१४ वर्षांचा वनवास’ अखेर संपला! मामी सुनीता अहुजा आणि कृष्णा अभिषेकने एकमेकांना मारली मिठी

spot_img

कपिल शर्माच्या शोमध्ये झाले भावनिक री-युनियन; ‘भूतकाळ विसरले, आता फक्त आशीर्वाद’ म्हणत सुनीता यांनी मिटवला वाद

बॉलिवूडचा ‘हिरो नं. १’ गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यातील तब्बल १४ वर्षांपासून सुरू असलेल्या शीतयुद्धाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे तोंडही न पाहणाऱ्या या कुटुंबात पुन्हा एकदा प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. सोशल मीडियावर सध्या एका व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू असून, यामध्ये गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा, कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी काश्मिरा शाह एकाच मंचावर भावूक होताना दिसत आहेत. एकमेकांसमोर येताच सुनीता आणि कृष्णाने एकमेकांना घट्ट मिठी मारली, हा क्षण पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वच जण गहिवरले.

या भेटीदरम्यान सुनीता अहुजा यांनी उच्चारलेले “१४ वर्षांचा वनवास संपला” हे वाक्य सध्या सर्वत्र गाजत आहे. मामीचे हे प्रेमळ शब्द ऐकून कृष्णालाही आपले अश्रू अनावर झाले. “मामी आज या शोमध्ये येईल याची आम्हाला कल्पनाच नव्हती, हे आमच्यासाठी सर्वात मोठे सरप्राईज आहे,” अशा शब्दांत कृष्णाने आपला आनंद व्यक्त केला. २०१६ मध्ये ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कृष्णाने केलेल्या एका विनोदावरून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला होता की, गोविंदा शोमध्ये असताना कृष्णाने अनेकदा पाठ फिरवली होती. मात्र, आता सर्व जुने हेवेदावे बाजूला सारून हे कुटुंब एकत्र आले आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सुनीता अहुजा यांनी मनोमिलनाचे संकेत दिले होते. “मी माझ्याच मुलांवर किती काळ रागावणार? आता मनात कोणतीही कटुता नाही, मला फक्त सर्व मुलांना आशीर्वाद द्यायचे आहेत,” असे म्हणत त्यांनी कृष्णाला माफ केल्याचे स्पष्ट केले. कृष्णा हा आपल्या मेहुण्याच्या मुलांसारखाच स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढला असून, आता सर्वांनी एकत्र हसावे-खेळावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. या भावनिक भेटीमुळे गोविंदा आणि कृष्णा यांच्यातील दुरावा कायमचा संपला असून, पुन्हा एकदा मामा-भाच्याची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होईल, अशी आशा चाहत्यांना लागली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ