Beauty : भारतात ५० रुपये, तर अमेरिकेत… आयब्रोच्या किमती ऐकून बसेल धक्का; पाहा काय आहे नेमका फरक

spot_img

न्यूयॉर्कमध्ये आयब्रो करणे पडते महाग; ‘टीप’ आणि कडक नियमांमुळे भारतीयांच्या खिशाला बसतो कात्री

सौंदर्याच्या बाबतीत महिलांसाठी ‘आयब्रो’ हा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. भारतात कोणत्याही गल्लीबोळातील पार्लरमध्ये २० ते ५० रुपयांत परफेक्ट शेपमध्ये आयब्रो करून मिळतात. मात्र, तोच आयब्रोचा ‘पिळ’ अमेरिकेत घेण्यासाठी तुम्हाला हजारो रुपये मोजावे लागू शकतात. भारतात आयब्रो करण्यासाठी लागणारा खर्च आणि अमेरिकेतील दर यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. अमेरिकेत स्थलांतरित होणाऱ्या भारतीयांना जेव्हा तिथल्या ब्युटी पार्लरचे बिल हातात मिळते, तेव्हा तो एक मोठा आर्थिक धक्काच असतो.

अमेरिकेत आयब्रो थ्रेडिंग करण्यासाठी १० ते ४२ डॉलर्सपर्यंत खर्च येतो, ज्याचे भारतीय रुपयांत रूपांतर केल्यास अंदाजे ८५० ते ३,५०० रुपये होतात. जर तुम्ही न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस किंवा सॅन फ्रान्सिस्को सारख्या महागड्या शहरांमध्ये हाय-प्रोफाईल स्टुडिओमध्ये गेलात, तर हा खर्च ३,५०० रुपयांच्याही पलीकडे जातो. याउलट, भारतातील कोणत्याही शहरात आयब्रोचा वार्षिक खर्च जेमतेम २५० ते ३०० रुपये असतो, तर अमेरिकेत याच कामासाठी वर्षाकाठी २१ हजार ते ३४ हजार रुपये खर्च करावे लागतात.

अमेरिकेत हा खर्च इतका जास्त असण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. तिथे केवळ आयब्रोच्या किमतीच जास्त नाहीत, तर त्यावर १५ ते २० टक्के ‘टीप’ देणे हा तिथला शिष्टाचार मानला जातो, ज्यामुळे खर्च अधिकच वाढतो. याव्यतिरिक्त, अमेरिकेतील दुकानांचे प्रचंड भाडे, कर्मचाऱ्यांचे उच्च वेतन आणि ब्युटी सर्व्हिसेससाठी असलेले कडक सरकारी नियम व परवाना शुल्क (License Fees) यामुळे तिथल्या सेवा महागड्या झाल्या आहेत. त्यामुळेच, भारतात स्वस्त वाटणारे हे काम अमेरिकेत मात्र विलासी सेवा (Luxury Service) ठरत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ