spot_img

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाजवळ व्यक्तीने आत्मदहनाचा केला प्रयत्न

spot_img

कणकवली जमिनीच्या नुकसानभरपाई प्रकरणात न्याय न मिळाल्याने प्रकाश सावंतने रॉकेल ओतून स्वतःला पेटवले

कणकवली (Kankavli) येथील जमिनीच्या नुकसानभरपाईसंदर्भात न्याय न मिळाल्याने 45 वर्षीय प्रकाश सावंत (Prakash Sawant) यांनी 15 डिसेंबर रोजी दुपारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गेट क्रमांक चारजवळ आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांनी अंगावर रॉकेल ओतले आणि 50 ते 60 टक्के जखमी झाले. प्रकाश सावंत यांच्यावर सध्या जी.टी. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

प्रकाश सावंत हे विरार येथील रहिवासी आहेत. नरडवे महमदवाडी प्रकल्पामुळे त्यांची कणकवली येथील जमीन शासनाने हस्तगत केली होती. मोबदल्यासाठी त्यांनी 2021 मध्ये वकील स्नेहा हरणे यांना 6 लाख 80 हजार रुपये दिले, पण उर्वरित रक्कम मिळाली नाही. याबाबत त्यांनी बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, कणकवली तहसिलदार, उच्च अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी दिल्या, पण त्यांना न्याय मिळालेला नाही.

न्या. जोशी यांनी स्नेहा हरणे यांना व्याजासहित सर्व रक्कम परत करण्याचे आदेश दिले होते. मात्र, 6 लाख रुपये परत केल्याशिवाय बाकी रक्कम दिली गेली नाही. न्याय न मिळाल्याने नैराश्यात असलेल्या प्रकाश सावंत यांनी आज उच्च न्यायालयाच्या गेटसमोर हा घातक प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रकाश सावंत गंभीर जखमी झाले. पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ