Parth Pawar : पवार कुटुंबात पुन्हा वाजणार सनई-चौघडे! पार्थ पवार ‘या’ काश्मिरी सुकन्येसोबत अडकणार लग्नबंधनात

spot_img

२९ जुलै रोजी होणार भव्य साखरपुडा; सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नात सुनेत्रा पवारांसोबत एन्ट्री घेणाऱ्या ‘कायनात धार’ बनणार घरची सून

पवार कुटुंबात सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा शाही विवाहसोहळा मुंबईत पार पडला. हा आनंद ओसरतो न ओसरतो, तोच आता पवार घराण्यात पुन्हा एकदा सनई-चौघडे वाजणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ज्येष्ठ सुपुत्र पार्थ पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. पार्थ पवार यांचा साखरपुडा अत्यंत थाटामाटात पार पडणार असून, त्यांच्या भावी जोडीदाराचे नाव समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ पवार हे ‘कायनात धार’ यांच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहेत. २९ जुलै रोजी या दोघांचा साखरपुडा सोहळा संपन्न होणार असल्याचे वृत्त आहे. नुकत्याच पार पडलेल्या रेवती सुळे यांच्या विवाहसोहळ्यात कायनात धार यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. या सोहळ्यात त्यांनी थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत ग्रँड एन्ट्री केली होती. तेव्हापासूनच राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर ‘पवार कुटुंबासोबत आलेली ही तरुणी कोण?’ याविषयी जोरदार चर्चा रंगू लागली होती. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून त्या पवार घराण्याची थोरली सून बनणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कायनात धार या मूळच्या काश्मीरमधील असून सध्या त्या दिल्लीमध्ये कार्यरत आहेत. त्यांचे आणि पवार कुटुंबाचे अत्यंत जवळचे व जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध असल्याचे सांगितले जाते. काही महिन्यांपूर्वी पार्थ पवार आणि कायनात या दोघांनी उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र दर्शन घेतले होते, त्याचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. याशिवाय, पवार कुटुंबाच्या अनेक सुख-दुःखाच्या प्रसंगातही कायनात यांची उपस्थिती राहिलेली आहे. आता २९ जुलै रोजी होणाऱ्या या साखरपुड्यामुळे पवार कुटुंबात पुन्हा एकदा नवचैतन्य येणार असून, या सोहळ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ