Kolhapur : अंबाबाई मंदिरात मोठी चोरी! १२-शे वर्षे जुन्या कारंजाचे दुर्मिळ दगड गायब; उच्च न्यायालयाचे सरकारला महत्त्वाचे निर्देश

spot_img

ऐतिहासिक बेसाल्ट खडकाचे दगड चोरल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप, तर मंदिराच्या सुरक्षेची अधिसूचना १५ दिवसांत काढण्याचे हायकोर्टाचे आदेश

कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि साडेतीन शक्तिपीठांपैकी महत्त्वाचे आद्यपीठ मानल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर परिसरातील सुमारे १२-शे वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या प्राचीन कारंजाच्या ढाच्यातील दुर्मिळ दगड भल्या पहाटे अज्ञात व्यक्तींनी काढून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिराची मूळ वास्तू आणि हा कारंजा तयार करण्यासाठी अत्यंत टणक व टिकाऊ मानल्या जाणाऱ्या दख्खनच्या काळ्या बेसाल्ट खडकाचा वापर करण्यात आला होता. या प्राचीन रचनेची तोडफोड करून हे ऐतिहासिक दगड चोरल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला असून, याप्रकरणी आता प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

दुसरीकडे, अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेबाबत एक मोठा कायदेशीर निर्णय समोर आला आहे. गेल्या १० वर्षांपासून प्रलंबित असलेली मंदिराच्या सुरक्षेशी संबंधित अंतिम अधिसूचना येत्या १५ दिवसांच्या आत जारी करण्याचे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. न्यायमूर्ती वृषाली जोशी आणि न्यायमूर्ती संदीप पाटील यांच्या खंडपीठासमोर गजानन विश्वनाथ मुनिश्वर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर २० जुलै रोजी सुनावणी झाली, ज्यानंतर कोर्टाने हे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ