Foundation Shade : परफेक्ट फाउंडेशन निवडायचंय? त्वचेच्या प्रकारानुसार करा योग्य फाउंडेशनची निवड

spot_img

मेकअप करताना सर्वात महत्त्वाची भूमिका फाउंडेशनची असते. योग्य फाउंडेशन चेहऱ्याला नैसर्गिक, फ्रेश आणि आकर्षक लूक देते, तर चुकीची शेड संपूर्ण मेकअपचा प्रभाव खराब करू शकते. त्यामुळे फाउंडेशन खरेदी करताना केवळ त्वचेचा रंग पाहून घेणे पुरेसे नसते. तुमचा स्किन टोन, अंडरटोन आणि त्वचेचा प्रकार समजून घेतल्यास परफेक्ट फाउंडेशन निवडणे अधिक सोपे होते.

फाउंडेशन निवडताना सर्वप्रथम अंडरटोन ओळखणे गरजेचे आहे. अनेकदा त्वचेचा रंग एकसारखा दिसला तरी अंडरटोन वेगळा असू शकतो. मनगटावरील शिरा हिरव्या दिसत असतील, तर तुमचा अंडरटोन वॉर्म समजला जातो आणि पिवळसर किंवा गोल्डन बेस असलेले फाउंडेशन योग्य ठरते. जर शिरा निळ्या किंवा जांभळ्या दिसत असतील, तर कूल अंडरटोनसाठी गुलाबी किंवा निळसर बेस असलेल्या शेड्स अधिक चांगल्या दिसतात. तर काहींचा अंडरटोन न्यूट्रल असतो, ज्यामध्ये दोन्ही छटांचा समतोल असतो.

फाउंडेशन टेस्ट करण्याची योग्य पद्धतही अनेकांना माहिती नसते. बऱ्याचदा लोक हातावर फाउंडेशन लावून शेड निवडतात, पण चेहरा आणि हाताचा रंग वेगळा असू शकतो. त्यामुळे योग्य शेड तपासण्यासाठी ती जॉ लाईनवर लावणे अधिक योग्य मानले जाते. जी शेड त्वचेमध्ये सहज मिसळते आणि वेगळी दिसत नाही, तीच परफेक्ट शेड ठरते.

त्वचेच्या प्रकारानुसार फाउंडेशन निवडणेदेखील महत्त्वाचे असते. तेलकट त्वचेसाठी मॅट फिनिश फाउंडेशन उत्तम ठरते, कारण ते अतिरिक्त तेलकटपणा नियंत्रित करते. तर कोरड्या त्वचेसाठी ड्यूई किंवा हायड्रेटिंग फाउंडेशन योग्य असते, जे त्वचेला ओलावा देऊन ग्लोइंग लूक देते.

फाउंडेशन खरेदी करण्यापूर्वी ते नैसर्गिक प्रकाशात तपासणेही आवश्यक आहे. दुकानातील कृत्रिम प्रकाशात शेड वेगळी दिसू शकते. तसेच काही फाउंडेशन वेळेनुसार गडद होतात, त्यामुळे शेड लावल्यानंतर काही मिनिटे थांबून त्याचा अंतिम परिणाम पाहणे अधिक फायदेशीर ठरते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ