अंपायरच्या निर्णयावर सोशल मीडिया दोन गटात विभागला; ‘कन्कशन सब्स्टीट्यूट’च्या नियमावरून नवा वाद
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात एका तांत्रिक नियमामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी खळबळ उडाली. नियमानुसार एका संघात ११ किंवा इम्पॅक्ट प्लेअरसह १२ खेळाडू खेळू शकतात, मात्र या सामन्यात मुंबईकडून तब्बल १३ खेळाडू मैदानात दिसले. डावाच्या १७ व्या षटकात मिचेल सँटनरला झेल घेताना दुखापत झाली. सुरुवातीला ही दुखापत खांद्याची वाटत होती, मात्र रिप्लेमध्ये डोक्याला दुखापत (Concussion) झाल्याचे स्पष्ट झाल्याने अंपायरनी ‘कन्कशन सब्स्टीट्यूट’ला परवानगी दिली. यामुळे सँटनरच्या जागी शार्दुल ठाकूर मैदानात आला.
मुंबईने याआधीच अल्लाह गजनफरच्या जागी दानिश मालेवारला ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून खेळवले होते. अशा प्रकारे ११ मूळ खेळाडू + १ इम्पॅक्ट प्लेअर + १ कन्कशन सब अशा एकूण १३ खेळाडूंनी या सामन्यात सहभाग नोंदवला. आयपीएलच्या इतिहासात अशी घटना अत्यंत दुर्मिळ मानली जाते. दरम्यान, या निर्णयावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी सँटनरची दुखापत गंभीर होती की ही केवळ रणनीती होती, असा सवाल उपस्थित करत अंपायरच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे. पराभवाच्या हॅटट्रिकसोबतच मुंबईच्या या ‘तेरा’ खेळाडूंच्या प्रयोगाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
मुंबई इंडियन्सने आधीच इम्पॅक्ट प्लेयरचा वापर केला होता. त्यांनी अल्लाह गजनफरच्या जागी दानिश मालेवारला उतरवलं. इम्पैक्ट प्लेयर + एक कॉन्कशन सब यामुळे मुंबईकडून या सामन्यात 13 खेळाडू खेळले. आयपीएलमध्ये अशी घटना फार कमीवेळा पहायला मिळते. मुंबईच्या या निर्णयाने सगळेच जण हैराण झाले आहेत.




