Mumbai Crime : नेस्को येथील कार्यक्रमात अमली पदार्थांच्या वापराचा संशय; पोलिसांसह अनेकांविरोधात गुन्हा

spot_img

मुंबईतील NESCO येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कॉन्सर्टमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मनोरंजनासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने कथितपणे ड्रग्स पार्टीचं रूप घेतल्याचा आरोप समोर आला असून, या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने प्रकरण अत्यंत गंभीर बनलं आहे. कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता आणि त्यादरम्यान मद्याबरोबरच अमली पदार्थांचाही वापर मोठ्या प्रमाणात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या सगळ्या प्रकाराकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याची शक्यता तपासली जात असून, या प्रकरणात दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह इंद्रजित सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर मारहाण, शिवीगाळ तसेच खंडणी मागण्याचे आरोप लावण्यात आले आहेत.

वैद्यकीय अहवालानुसार, मृत्यू झालेल्या दोघांनी कार्यक्रमाला जाण्यापूर्वी प्रत्येकी एक कॅप्सूल घेतली होती. त्यानंतर कार्यक्रमादरम्यान आणखी एक कॅप्सूल घेतल्याने ओव्हरडोस झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, एका तरुणीचा जीव थोडक्यात वाचला. तिला उलट्या झाल्यामुळे तिच्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडल्याने ती सावरू शकली, असं डॉक्टरांनी सांगितलं.
या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली असून, कॉन्सर्टच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा प्रकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पोलिस आणि संबंधित यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, यामागील नेमकी कारणं आणि जबाबदार व्यक्ती शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ