Rahul Ramakrishna : ‘अर्जुन रेड्डी’ फेम राहुल रामकृष्णवर दुःखाचा डोंगर; पंतप्रधानांकडे मदतीची हाक

spot_img

‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता राहुल रामकृष्ण सध्या वैयक्तिक दुःखातून जात आहे. ‘पॅराक्वाट’ या अत्यंत विषारी रसायनामुळे त्याच्या भावाचा मृत्यू झाल्याची माहिती त्याने स्वतः सोशल मीडियावर दिली आहे. या घटनेमुळे तो पूर्णपणे हादरून गेला असून, त्याने सरकारकडे तातडीने या रसायनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

राहुलने आपल्या पोस्टमध्येनरेंद्र मोदी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना टॅग करत या गंभीर समस्येकडे लक्ष वेधलं आहे. त्याने म्हटलं आहे की, ‘पॅराक्वाट’ हे अत्यंत जीवघेणं रसायन असून, त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. इतकं धोकादायक रसायन सहज उपलब्ध असणं चिंताजनक असल्याचंही त्याने नमूद केलं.

‘पॅराक्वाट’ हे मुख्यतः शेतीत तणनाशक म्हणून वापरलं जाणारं रसायन आहे. मात्र, मानवी शरीरासाठी ते अत्यंत घातक ठरतं. शरीरात गेल्यास किंवा संपर्क आल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात, अगदी मृत्यूसुद्धा ओढवू शकतो. राहुलच्या भावाच्या बाबतीत हे रसायन नेमकं कशा प्रकारे संपर्कात आलं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

या दुर्दैवी घटनेनंतर राहुल रामकृष्णने सरकारला आवाहन करत या रसायनावर तातडीने बंदी घालावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील आणि अनेकांचे प्राण वाचतील.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ