spot_img

Gold Silver Rate : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदीही झाली स्वस्त

spot_img

सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली असून, मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी हालचाल झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी सुमारे १,३५,१४१ रुपयांवर आला आहे. यापूर्वी तो १,४७,२१८ रुपयांवर होता, म्हणजेच सुमारे १२ हजार रुपयांपेक्षा अधिक घसरण झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याच्या दरातही लक्षणीय घट झाली असून, तो १,४६,६२८ रुपयांवरून घसरत १,३४,६०० रुपयांवर आला आहे. १८ कॅरेट सोन्याच्या किमतीतही सुमारे ११ हजार रुपयांची घट नोंदवली गेली आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी पडझड झाली आहे. एका किलो चांदीचा दर २,०१,५०० रुपयांपर्यंत खाली आला असून, यापूर्वी तो २.३२ लाख रुपयांच्या आसपास होता. म्हणजेच चांदीतही तब्बल ३० हजार रुपयांहून अधिक घसरण झाली आहे.

या दरकपातीमुळे ग्राहक आणि गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला असून, पुढील काही दिवसांत बाजारातील परिस्थिती कशी राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ