spot_img

Dhurandhar 2 : अभिनेता दानिश इक्बालने मांडला पडद्यामागचा थरार आणि रिप्लेस होण्याची भीती

spot_img

गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर एकच चर्चा होती की, ‘धुरंधर’ चित्रपटातील तो अदृश्य ‘बडे साहब’ नेमका कोण? अखेर १९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाने या रहस्यावरून पडदा उचलला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम म्हणजेच ‘बडे साहब’ असून, ही आव्हानात्मक भूमिका अभिनेता दानिश इक्बाल याने जिवंत केली आहे. मात्र, ही भूमिका साकरणं दानिशसाठी सोपं नव्हतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने या भूमिकेसाठी घेतलेल्या कष्टांचा आणि मानसिक ओढाताणीचा खुलासा केला आहे.

दानिशने सांगितले की, पडद्यावर केवळ काही मिनिटे दिसणाऱ्या या लूकसाठी त्याला रोज ७ ते ८ तास प्रोस्थेटिक मेकअपसाठी बसावे लागायचे आणि शूटिंग संपल्यावर तो काढण्यासाठी पुन्हा ३ ते ४ तास लागायचे. विशेष म्हणजे, सुरुवातीला त्यालाही माहित नव्हते की तोच ‘बडे साहब’ आहे. “मला फक्त दाऊदची भूमिका करायची आहे आणि तो अंथरुणाला खिळलेला असेल इतकेच सांगण्यात आले होते. जेव्हा सोशल मीडियावर बडे साहब म्हणून ओसामा बिन लादेन किंवा परवेज मुशर्रफ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली, तेव्हा मला प्रथमच जाणीव झाली की मी एका मोठ्या रहस्याचा भाग आहे,” असे दानिश म्हणाला.

चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर सोशल मीडियावर बडे साहबच्या भूमिकेसाठी सलमान खान किंवा इमरान हाश्मी यांच्यासारख्या बड्या स्टार्सची नावे घेतली जात होती. या चर्चांमुळे दानिश इतका घाबरला होता की, दिग्दर्शक आदित्य धरने आपल्याला रिप्लेस तर केले नाही ना, हे विचारण्यासाठी तो फोन करणार होता. मात्र, आदित्य धर यांनी दानिशवर विश्वास दाखवला आणि आज त्याच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ