Noida Massive Fire : दिल्लीनंतर आता नोएडामध्ये अग्नितांडव! १२ व्या मजल्यावरील फ्लॅट जळून खाक, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

spot_img

मालवीय नगरमधील दुर्घटनेनंतर सेक्टर ७४ मधील आयव्ही काउंटी सोसायटीत आग; जोरदार वाऱ्यामुळे शेजारील फ्लॅटही कचाट्यात

दिल्ली-एनसीआर परिसरामध्ये सध्या आगीच्या सत्राने थैमान घातले असून, दिल्लीतील मालवीय नगरमधील हॉटेलच्या भीषण आगीनंतर आता नोएडामध्येही अग्नितांडव पाहायला मिळाले. नोएडाच्या सेक्टर ७४ मधील ‘आयव्ही काउंटी’ (IVY County) या उच्चभ्रू हायराईज निवासी सोसायटीमध्ये आज सकाळी ७ वाजून २० मिनिटांच्या सुमारास एका बहुमजली इमारतीला आग लागली. ही आग इमारतीच्या १२ व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये लागली होती, ज्याने परिसरात वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे रौद्ररूप धारण करत शेजारील दुसऱ्या फ्लॅटलाही आपल्या कचाट्यात घेतले. आगीच्या भीषण ज्वाला आणि काळ्या धुराचे साम्राज्य पाहून संपूर्ण सोसायटीत एकच खळबळ उडाली आणि रहिवाशांनी तातडीने इमारतीखाली धाव घेतली. १२ व्या मजल्याच्या उंचीमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना पाण्याचा मारा करताना सुरुवातीला मोठ्या अडचणी आल्या, मात्र ६ गाड्यांच्या मदतीने बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले. शेजारच्या फ्लॅटमध्ये पीजी (PG) म्हणून काही तरुण राहत असल्याने तिथे काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत होती, त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून आजूबाजूचे फ्लॅट्स रिकामे करून नागरिकांना सुरक्षित स्थानी हलवले. या आगीत मूळ फ्लॅट पूर्णपणे जळून खाक झाला असून, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचा संशय आहे. सध्या पोलीस आणि अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशन सुरू असून जीवितहानीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ