Marathi Movie : ‘तुला पाहता’मधून पहिल्या प्रेमाची आठवण; तीन पिढ्यांची भावनिक कहाणी मोठ्या पडद्यावर

spot_img

“प्रेम कसं करायचं हे अनेकजण शिकवतात, पण ते विसरायचं कसं, हे कोणी सांगत नाही,” या भावनेवर आधारित तुला पाहता हा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून हरवलेल्या प्रेमाची, पुन्हा भेटण्याची आणि काळानुसार बदलणाऱ्या नात्यांची एक हृदयस्पर्शी कथा उलगडणार आहे चित्रपटाची खासियत म्हणजे तो १९७० च्या दशकापासून आजच्या आधुनिक काळापर्यंतचा प्रवास दाखवतो. जुन्या काळातील वेशभूषा, संगीत आणि वातावरण यामुळे प्रेक्षकांना त्या काळाची आठवण येईल, तर आजच्या भागात ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ आणि ‘जनरेशन गॅप’ यांसारख्या सध्याच्या सामाजिक विषयांवर भाष्य करण्यात आले आहे. त्यामुळे हा चित्रपट तीन पिढ्यांना जोडणारा ठरणार आहे.

या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि इला भाटे ही जोडी प्रथमच एकत्र दिसणार आहे. त्यांच्यासोबत नचिकेत लेले आणि मानसी पाटील यांची तरुण जोडीही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तसेच निशिगंधा वाड, आनंद काळे आणि इतर कलाकारांनीही चित्रपटाला बळकटी दिली आहे.

चित्रपटाची निर्मिती मयूर प्रधान यांनी केली असून कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. छायांकन, संगीत आणि नृत्यदिग्दर्शन या सर्व बाबींमध्येही चित्रपटाला दर्जेदार टीम लाभली आहे.अलीकडेच चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. १० जुलै रोजी हा चित्रपट जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे. कुटुंबासह पाहण्याजोगा आणि भावनिक पातळीवर जोडणारा हा चित्रपट प्रेक्षकांना जुन्या आठवणींमध्ये नेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ