Maharashtra : भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर २.२५ महिन्यांत ५० भोंदू बाबांचा दरबार उधळला!

spot_img

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ५ गुन्हे दाखल; सर्वच धर्मांतील भोंदूंचा समावेश; अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून (अंनिस) पीडित महिलांना पुढे येण्याचे आवाहन.

नाशिक येथील भोंदू अशोक खरात याच्या कृत्यामुळे संपूर्ण राज्य हादरले असताना, या कारवाईनंतरच्या अवघ्या सव्वा दोन महिन्यांत महाराष्ट्र पोलिसांनी बुवाबाजी आणि भोंदूगिरीविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. या कालावधीत राज्यातील विविध भागांतून तब्बल ५० भोंदू बाबांचे छुपे दरबार आणि अड्डे पोलिसांनी उधळून लावले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) अधिकृत पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ५० प्रकरणांपैकी सर्वाधिक ५ गुन्हे एकट्या नाशिक जिल्ह्यात नोंदवले गेले आहेत. या संपूर्ण गुन्ह्यांची अधिकृत यादी अंनिसचे राज्यकार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी संकलित केली असून, राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, बुवाबाजी संघर्ष विभागाच्या कार्यवाह ॲड. रंजना गवांदे आणि सहकार्यवाह विष्णुदास लोणारे यांनी याविषयीचे वास्तव समोर आणले आहे.

या विशेष यादीचे विश्लेषण केले असता, यात कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे नसून बहुतांश सर्वच धर्मांतील भोंदू बाबांचा आणि मांत्रिकांचा समावेश आहे. त्यामुळे ‘अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केवळ हिंदू धर्मातच केले जाते’ या सनातनी संघटनांच्या जुन्या आरोपांना या कारवाईमुळे प्रशासनाने आणि अंनिसने चोख उत्तर दिले आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांवरून असे दिसून येते की, या भोंदू बाबांनी ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील भोळ्याभाबड्या जनतेची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली आहे. यामध्ये सर्वात चिंताजनक बाब म्हणजे बहुतांश प्रकरणांमध्ये पीडित महिलांचे लैंगिक व शारीरिक शोषण झाले असून, त्यांना मोठ्या आर्थिक लुटीलाही सामोरे जावे लागले आहे. अनेक पीडित महिला सामाजिक प्रतिष्ठा आणि भीतीपोटी सुरुवातीला समोर येण्यास घाबरत होत्या; मात्र अशोक खरात प्रकरणानंतर राज्यातील महिलांमध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची एक नवीन हिंमत आणि न्यायाची अपेक्षा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, समाजात लपलेल्या इतरही भोंदूंचा पर्दाफाश करण्यासाठी आणखी पीडितांनी न घाबरता पुढे यावे, असे जाहीर आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आले आहे.

राज्यात गुन्हे दाखल झालेल्या ५० भोंदूंची अधिकृत यादी

राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत पकडल्या गेलेल्या भोंदू बाबांची आणि त्यांच्या कार्यक्षेत्राची सविस्तर यादी खालीलप्रमाणे आहे:

क्र.भोंदू बाबाचे नावकार्यक्षेत्र / ठिकाण
अशोक कुमार खरातनाशिक
गडगेबाबा राजेंद्र गडगेसंगमनेर, अहिल्यानगर
चेतन सुनील माळीमूर्तिजापूर, अकोला
पंकज देवराम घोलपयेडगांव, पुणे
मोहन मामा भोसलेकुर्डुवाडी, सोलापूर
नाना बर्डेआळे फाटा, पुणे
ऋषिकेश वैद्यवसई, मुंबई
अल्ताफ रईस खानमालाड, मुंबई
रिधम यांन्चाळमालाड, मुंबई
१०गणेश शिंदेश्रीरामपूर, अहिल्यानगर
११अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबानवी मुंबई
१२विठोबा वाल्मीक जाटसातपूर, नाशिक
१३किसन तळपे मंदोशीखेड
१४महेशगिरी उर्फ महेश काकडेलासलगाव, नाशिक
१५अब्दुल रशीद शेखखालापूर, रायगड
१६इरफान नियाज अहमदकांदिवली, मुंबई
१७अनिल सोलोमन सिंगपादरी, पुणे
१८शिवराम पराश सावरपालघर
१९अल्ताफ हसन मदारीजळगाव
२०नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकरटेंभुर्णी, सोलापूर
२१पिंटू धुमाळबारामती, पुणे
२२हेमदास किसन बावणेअड्याळ, भंडारा
२३चंद्रकांत राजेंद्र माळीइगतपुरी, नाशिक
२४अशोक मधुकर आढावश्रीरामपूर, अहिल्यानगर
२५औदुंबर गडदेस्वारगेट, पुणे
२६नवनाथ गवळीखेड, पुणे
२७शाहिद शेखखड़कपाडा, कल्याण
२८शिव भाऊ सोनवणेसर्जेपुरा, अहिल्यानगर
२९ज्ञानेश्वर नागोराव कोरडेबिलोली, नांदेड
३०रमेश गुप्तामालाड, मुंबई
३१हरिगिरी दत्तगिरी महाराजभाग्यनगर, नांदेड
३२मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षितठाणे
३३कृष्णा उर्फ भगत सुभाष चित्तेपश्चिम देवपूर, धुळे
३४यशवंत एकनाथ थोरातपारनेर, अहिल्यानगर
३५श्याम महाराज राठोडदिघी, पुणे
३६सुधाकर गाडगेबाळापूर, अकोला
३७परमेश्वर उर्फ प्रमोद बाळू गायकवाडउत्तमनगर, पुणे
३८शितल सालके व पोर्णिमासारस्वत भारती विद्यापीठ, पुणे
३९योगेश उर्फ भैय्या बापू खैरनारनिजामपूर, साक्री, धुळे
४०विठ्ठल पवारमहागाव, यवतमाळ
४१ताहीर रशीद बेगसक्करदरा, नागपूर
४२सुधाकर रमेश काळेअंजनगाव सुर्जी, अमरावती
४३अशोक रामधन राठोडवडगाव (जंगल), यवतमाळ
४४महेश मोहन बाबरविटा, सांगली
४५कमलेश महाराज अधिकारीइंदिरानगर, नाशिक
४६परवेज अब्दुल अजीज मेमनकोंढवा, पुणे
४७गंगाधर बुरांडेसावली, चंद्रपूर
४८भीमराव पुंजाराम बिहाडेसंभाजीनगर
४९मुक्तानंदगिरी महाराज उर्फ बापू महाराजकन्नड, संभाजीनगर
५०राजू बन्सी दिवटेपारनेर, अहिल्यानगर

काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून दिलेल्या तक्रारींमुळे, तर काही ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अथक प्रयत्नांमुळे हे गुन्हे दाखल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पुरोगामी आणि सुशिक्षित मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर भोंदूंचे पेव फुटल्यामुळे सध्या संपूर्ण राज्यभरात चिंतेचे वातावरण पसरले असून, यावर कडक सामाजिक आणि कायदेशीर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ