Korean Beauty Tips : कोरियन महिलांच्या ‘ग्लोइंग’ आणि गुलाबी गालांचे गुपित; घरच्या घरी ‘या’ नैसर्गिक उपायांनी मिळवा तसाच चेहरा!

spot_img

बदलत्या ब्युटी ट्रेंड्समध्ये कोरियन स्किनकेअरला वाढती पसंती; स्वयंपाकघरातील साहित्याचा वापर करून त्वचा बनवा मऊ आणि चमकदार

सध्या जगभरात आणि सोशल मीडियावर कोरियन ब्युटी ट्रेंड्सची (Korean Beauty Trends) प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. कोरियन महिलांची त्वचा कमालीची गुळगुळीत, काचेसारखी चमकदार (Glass Skin) आणि गाल नैसर्गिकरित्या गुलाबी कसे असतात, असा प्रश्न अनेकांना पडतो. महागडी ब्युटी प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी कोरियन स्किनकेअरमध्ये नैसर्गिक घटकांना आणि घरगुती उपायांना अधिक महत्त्व दिले जाते. अशाच काही सोप्या आणि प्रभावी घरगुती ट्रिक्सचा वापर करून तुम्हीही घरच्या घरी अगदी कोरियन मुलींसारखे गुलाबी आणि सुंदर गाल मिळवू शकता.

यासाठी पहिला उत्तम उपाय म्हणजे कच्चे दूध आणि गुलाबाच्या पाकळ्यांचे मिश्रण. एका वाटीत दोन ते तीन चमचे कच्चे दूध घेऊन त्यात गुलाबाच्या पाकळ्या कुस्करून टाकाव्यात आणि हे मिश्रण २० मिनिटे गालावर लावून ठेवावे; त्यानंतर कॉटन व पाण्याने चेहरा स्वच्छ केल्यास त्वचेला चांगला तजेलदारपणा येतो. दुसरा पर्याय म्हणजे बीट आणि कोरफडीचा रस. ताज्या कोरफडीच्या जेलमध्ये (Aloe Vera) बीटाच्या रसाचे काही थेंब मिसळून गालावर हलक्या हाताने मसाज केल्यास काही दिवसांतच गाल नैसर्गिकरित्या गुलाबी दिसू लागतात. याशिवाय, साखर आणि गुलाबजल किंवा खोबरेल तेल एकत्र करून चेहऱ्यावर गोलाकार मसाज केल्याने त्वचेवरील मृत पेशी (Dead Skin) निघून जातात, रक्ताभिसरण सुधारते आणि चेहऱ्याचा नूर बदलतो. हे उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्यास उत्तम फरक दिसून येतो.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ