Kalyan Doctor Assault Case : वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ठाणे सिव्हिल रुग्णालयात आंदोलन; सुरक्षेची मागणी

spot_img

कल्याण-डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला मारहाण झाल्याच्या कथित घटनेनंतर वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. ठाणे सिव्हिल रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकत्र येत निषेध आंदोलन केले. यावेळी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, तसेच रुग्णसेवा बजावणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

या प्रकरणावर वाढता जनक्षोभ आणि राजकीय दबाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवत रमेश म्हात्रे यांना अटक केली. अटकेनंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, न्यायालयीन प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेमुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ