Dr. Deepak Pawar Letter : उत्तर भारतीय राजकारण्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या चालकांना डॉ. दीपक पवारांनी सुनावले खडे बोल

spot_img

मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी ४ मे २०२६ पासून पुकारण्यात आलेल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत आक्रमक आणि उपरोधिक खुले पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्राद्वारे त्यांनी परप्रांतीय चालक आणि त्यांच्या नेत्यांवर जोरदार टीका केली असून, महाराष्ट्राने पोटाला लावूनही येथील मातीबद्दल कृतज्ञता नसणाऱ्यांना त्यांनी आरसा दाखवला आहे. “महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर प्रेम नसणाऱ्यांना बांधव म्हणणे अशक्य आहे,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. या संपामुळे जर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोलमडणार असेल, तर मराठी माणसाने आता स्वयंपूर्ण होण्याची आणि आपल्या अस्तित्वाचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन त्यांनी या पत्रातून केले आहे.

पवार यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, घटनेने दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करून उत्तर भारतीय लॉबीने महाराष्ट्राला आपली वसाहत समजले आहे. रेल्वेपासून ते व्यवसायांपर्यंत सर्वत्र होणारे हिंदीचे आक्रमण आणि मराठी भाषेचा केला जाणारा अवमान आता सहन करण्यापलीकडे गेला आहे. “मराठी सक्तीचा निषेध म्हणून जर तुम्ही संपावर जाणार असाल, तर कायमचे आपल्या राज्यात निघून जा,” असा उपरोधिक सल्ला त्यांनी दिला आहे. मराठी माणसाने गुजराती-मारवाड्यांच्या भांडवलावर आणि परप्रांतीयांच्या श्रमावर अवलंबून राहण्यापेक्षा, स्वतःच्या पायावर उभे राहून ‘महाराष्ट्र धर्मा’चे रक्षण करावे, असे त्यांनी नमूद केले. येत्या १ मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी मराठीच्या अस्मितेसाठी आणि नवीन मराठीकरणाच्या सुरुवातीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करत त्यांनी या प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान दिले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ