Deepali Sayyad : भोंदूबाबा अशोक खरातच्या कुकर्मांवर येणार चित्रपट; दीपाली सय्यद महत्त्वाच्या भूमिकेत

spot_img

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने काही काळापूर्वी राज्यभरात मोठी खळबळ उडवली होती. स्वतःला अध्यात्मिक शक्ती असल्याचे भासवत अनेकांची फसवणूक करणाऱ्या खरातच्या कारनाम्यांनी समाजाला हादरवून सोडले होते. आता याच धक्कादायक घटनांवर आधारित एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.

चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबाबत सध्या विविध चर्चा रंगल्या आहेत. विशेषतः त्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत झळकू शकतात, अशी चर्चा मनोरंजन आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, याबाबत अधिकृत खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.

या चित्रपटाविषयी बोलताना दीपाली सय्यद यांनी सांगितले की, ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर त्यांना अशोक खरातच्या प्रकरणाची सविस्तर माहिती मिळाली. या कथानकाने त्यांना हादरवून टाकले आणि समाजासमोर सत्य मांडण्याची गरज असल्याचे त्यांना वाटले. त्यामुळे या चित्रपटाचा भाग होणे आपल्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी समाजालाही इशारा दिला. “आजही समाजात अनेक भोंदूबाबा वेगवेगळ्या स्वरूपात सक्रिय असू शकतात. लोकांनी अशा व्यक्तींवर आंधळा विश्वास ठेवू नये,” असे आवाहन त्यांनी केले. आपल्या भूमिकेबाबत मात्र त्यांनी शेवटपर्यंत गुप्तता राखण्याचा प्रयत्न केला. “मी नेमकी कोणती भूमिका साकारतेय, हे प्रेक्षकांना चित्रपटातूनच पाहायला मिळेल,” असे त्या म्हणाल्या. त्यामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ